Arun Kaduba Gangad,Class – 9th. ,From – Thakar Wadi
an NMMS Scholar,Feeling Hopeful Because of Free School Bus Service.
Arun, who lives in Thakarwadi and attends school in Tisgaon, is intelligent and hardworking. He has achieved success in the NMMS exam last year. He expressed joy about receiving free bus service, and he shared his opinion for the future.
Having achieved success in the scholarship exam, a new chapter has unfolded for my parents’ and my dreams. Despite our determination to educate ourselves, there was always fear lurking in our minds whether education would ever be complete. However, we received free bus passes, which has eased our minds. Now, it seems that there are no more obstacles for me to reach my goals. I express my gratitude to my teachers, my parents, and all the villagers who have contributed to my success. We are also deeply indebted to all those who give us alms.
With the assistance of all donors, Satyashodhak Mahila Vikas Mandal has initiated a free school bus service for students from economically disadvantaged backgrounds. We too should genuinely shoulder the responsibility by contributing Rs. 300 per student per month to this project.
ठाकर वाडी येथे राहणारा आणि तिसगाव विद्यालयात शिक्षण घेणारा अरुण हा हुशार,आणि मेहनती आहे.NMMS परीक्षेत त्याने गतवर्षी प्रावीण्य मिळवले आहे.त्याने मोफत बस विषयी आनंद व्यक्त केला,आणि पुढीलप्रमाणे आपला अभिप्राय व्यक्त केला.
मला शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळाल्याने माझ्या आणि माझ्या पालकांच्या स्वप्नांना नवीन पालवी फुटली आहे,आमची शिकण्याची जिद्द असूनही शिक्षण पूर्ण होईल की नाही अशी भीती मनात घर करून होती,परंतु आपण ज्या पद्धतीने मोफत बस ची सोय आमच्यासाठी केली आहे,आता असे वाटत आहे की मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आता काहीच अडथळा नाही.मी माझ्या वतीने,माझ्या पालकांच्या वतीने आणि संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने आपले आभार मानतो,आणि देणगी देणाऱ्या सर्व मान्यवरांचे देखील विशेष ऋण आमच्यावर आहे ,त्यांचे ही खूप धन्यवाद!
सर्व देणगीदारांच्या मदतीने सत्यशोधक महिला विकास मंडळ मार्फत दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूलबस सुरू करण्यात आली आहे. तरी आपण सुद्धा रुपये 300/- प्रति विद्यार्थी प्रति महिना देऊन ह्या प्रकल्पात मोलाचा हातभार लावावा हीच सदिच्छा.