Help Them To Get Rid From This/त्यांना अशा त्रासातून मुक्त करण्यासाठी सढळ हाताने मदत करा………….
Even today, many boys and girls are deprived of their right to free education. If these children, who haven’t received education and haven’t entered the mainstream, can the future of our country be bright? Will the children in the city, leading comfortable lives with all facilities, educated, pursuing their dreams and goals, with all amenities provided, outshine those children born in difficult, remote areas, who may not even complete secondary education due to circumstances? Will this be fair? Isn’t this in a way unjust to them? What fault do they have if they were born in poor households, in remote areas?
As we contemplate these and many such troubling questions, it has become clear to our organization that if someone is kept distant from critical matters like education simply because there are no schools in their village or well-maintained roads to walk on, and they end up losing their dreams in the dark depths of poverty, should we not take a step forward and provide them with the essential facility of free transportation? Shouldn’t we shield them from the hardships of rains, mud, thorns, wild animals, and treacherous paths?
And it is precisely for this reason that we have initiated the free school bus service for these impoverished students in remote areas, and for this initiative, we need your support as well as financial contributions! Therefore, let us join hands in this endeavor to brighten the future of these deserving children from remote areas. This is a humble request…
“With the help of generous donors, Satyashodhak Mahila Vikas Mandal, has started a free school bus service for students from underprivileged backgrounds. However, we also sincerely request you to consider contributing Rs. 450 per student per month to support this project financially.”
आजही कित्येक मुले – मुली त्यांच्या हक्काच्या मोफत शिक्षणापासून वंचित आहेत.आपल्या देशाचे भवितव्य असणारी ही बालके जर, शिक्षत झाली नाहीत, मुख्य प्रवाहात आलीच नाही,तर देशाचे भविष्य उज्वल होऊ शकेल का? शहरातील मुले संपूर्ण सोयीसुविधा युक्त आयुष्य उपभोगुन शिक्षित होऊन,आपली स्वप्ने,ध्येये गाठतील,आणि वाड्या – वस्त्या वरील, तांड्यावर राहणारी ,दुर्गम भागातील बालके साधे माध्यमिक शिक्षणही पूर्ण करण्यास अक्षम होतील, परिस्थितीपुढे हतबल होऊन शिक्षणापासून दूर राहतील,हे कितपत योग्य आहे? याला समानता म्हणता येईल का? हा एक प्रकारे त्यांच्यावर अन्याय नाही का? ते गरीब घरात, दुर्गम भागात जन्माला आले ,यात त्यांचा काय दोष?
या व अशा अनेक भेडसावणाऱ्या प्रश्नांवर विचारविनिमय केला असता, आमच्या संस्थेला असे जाणवले की, केवळ गावात शाळा नसल्याने, आणि पायी चालण्यास ही व्यवस्थित रस्ता नसल्याने जर कुणी शिक्षणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या बाबी पासून दूर राहत असेल,आपली स्वप्ने हिरावून बसत असेल, आणि दरिद्रतेच्या अंधकारमय डोहात कायमस्वरूपी बुडून जात असेल तर,त्यांच्यासाठी आपणच एक पाऊल घेत,पुढाकाराने त्यांना मोफत बस ची सुविधा का उपलब्ध करून देऊ नये?उन, वारा ,पाऊस ,चिखल ,काटे ,जीवघेणे डोंगराळ रस्ते इ.पासून त्यांची सुटका का करू नये?
आणि म्हणूनच आम्ही दुर्गम भागातील या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूल बस सुविधा चालू करीत आहोत,आणि यासाठी आम्हाला गरज आहे आपल्या समर्थनाची तसेच आर्थिक पाठबळाची! तेव्हा आपणही या उपक्रमात मोलाची साथ देऊन या निरागस लेकरांच्या उज्वल भवितव्यासाठी हातभार लावावा, ही नम्र विनंती….
सर्व देणगीदारांच्या मदतीने सत्यशोधक महिला विकास मंडळ मार्फत दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूलबस सुरू करण्यात आली आहे. तरी आपण सुद्धा रुपये 450/- प्रति विद्यार्थी प्रति महिना देऊन ह्या प्रकल्पात मोलाचा हातभार लावावा हीच सदिच्छा.