Mohan Ganesh Jogarana’s Family Giving Feedback On Donated Shoe
Mohan and his family are originally from Gujarat, but they wander for their livelihood. Their situation is precarious, lacking a stable home. In such circumstances, Mehul’s family struggles to educate him, but recognizing his need, your organization provided him with a boot. After a year of using it, when we met them, their reactions were as follows: “Our son can now go to school every day. The roads, especially during the rainy season, are very bad, slippery, and sometimes flooded, making it difficult to walk. Sometimes there are thorns on the way, and during the summer, his feet occasionally get blisters. But thanks to your organization, after overcoming all these obstacles, there’s a new ray of hope in his and our lives. Your heartfelt gesture is a beacon of hope for us. Through this, you have shown that nothing can stop you from learning until you have the desire to learn and are ready to help us. We are very grateful to your organization. Thank you very much!”
मोहन आणि त्याचा परिवार हे मूळ गुजरात चे आहेत,पण त्याचा परिवार उदरनिर्वाहासाठी भटकंती करतात.त्यांची परिस्थिती बेताची आहे.राहण्यासाठी पक्के घर देखील नाही.अशा परिस्थितीत मेहुल ला शिकविण्यासाठी त्याचा परिवार धडपड करीत आहे.त्याच्या गरजा ओळखून संस्थेने त्याला बूट दिले आणि एक वर्ष ते बूट वापरून झाल्यावर जेव्हा आम्ही त्यांना भेट दिली त्या वेळेस त्याच्या घरच्यांच्या प्रतिक्रिया अशा होत्या – आमच्या मुलाला रोज पायी शाळेत जावे लागते,त्यात रस्ते अत्यंत खराब आहेत,पावसाळ्यात तर चिखल,पाणी यांतून रस्ता काढत चालावे लागते,कधी पायात काटे घुसतात,तर उन्हाळ्यात कधी कधी पायाला फोडही येतात.पण तुमच्या संस्थेने त्याच्या ह्या सर्व अडचणी ज्या त्याच्या ज्ञानार्जनच्या आड येत होत्या त्यांचा समूळ नायनाट केला,हे उत्तम दर्जाचे नवीन बूट मिळाल्यानंतर त्याच्यात व आमच्यात देखील नवीन उम्मिद निर्माण झाली,तुमचे हे हृदयस्पर्शी कार्य आमच्यासाठी आशेचे किरण आहेत,यातून आपण सिद्ध करून दाखवलंय कि,कोणतीच गोष्ट तुम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवू शकणार नाही जोपर्यंत तुमची शिकण्याची इच्छा आणि आमची मदत करण्याची तयारी असेल.तुमच्या संस्थेचे खूप खूप आभार,धन्यवाद!
Mohan With His Family