Nandini Sanjay Rathod , Class – 8th
Neha Ankush Pawar , Class – 8 th
Monika Yogesh Pawar, Class – 7th
Students Both From GhusurTanda sharing Review About Free School Bus Service.
Ghusur Tanda, a small village nestled amidst hills. The children here do not have access to secondary education in the village. As a result, they have to travel 5-6 kilometers to another village for schooling. This journey requires them to walk, which is quite taxing. However, they received free bus service, so they said, “You have been very helpful; you have made free transportation available for our education. Thank you from the bottom of our hearts. We will definitely learn more and grow up, and this will be a great service to you and all the benefactors for a lifetime.”
With the help of all the donors, Satyashodhak Mahila Vikas Madal has started a free school bus service for students from economically disadvantaged backgrounds. However, we sincerely urge you to consider contributing Rs. 300 per student per month to support this project financially.
घुसूर तांडा,डोंगराच्या पायथ्याशी वसलेले हे छोटेसे गाव.इथल्या मुलांना गावात माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध नाही.परिणामी त्यांना 5-6 किलोमिटर अंतरावर असलेल्या गावात शिक्षणासाठी जावे लागते.हा प्रवास त्यांना पायीच करावा लागत असे,पण त्यांना मोफत बस सुविधा मिळाल्यामुळे त्यांनी ,”तुमची खूप मदत झाली,आमच्या शिक्षणासाठी तुम्ही मोफत शिक्षांसोबतच येण्या जाण्यासाठी मोफत बस देखील उपलब्ध करून दिली आहे ,आपले मनःपूर्वक आभार,आम्ही नक्कीच शिकून मोठे होऊ आणि यात आपला आणि सर्व देणगीदार यांचा मोठा वाटा असेल,आम्ही आयुष्यभर आपल्या मदतीसाठी ऋणी राहू”,अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
सर्व देणगीदारांच्या मदतीने सत्यशोधक महिला विकास मंडळ मार्फत दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूलबस सुरू करण्यात आली आहे. तरी आपण सुद्धा रुपये 300/- प्रति विद्यार्थी प्रति महिना देऊन ह्या प्रकल्पात मोलाचा हातभार लावावा हीच सदिच्छा.