Anjali Bhaskar Chavan Feeling Blessed Due to Free School Bus Service.
My parents are sugarcane harvesters, and our village is in a very remote area with no available transportation. Until now, I have completed my education by walking to and from school. However, my family was often worried and would frequently say that enough education had been achieved, which caused me a lot of anxiety, and I feared that my education might stop. But now, due to your free school bus service, there is a joyful atmosphere in our home and even throughout our entire village. Thanks to your help, children from remote areas like ours will now be able to get an education and achieve their dreams. Words cannot express how grateful we are. Thank you!
“With the help of generous donors, the Truthseeker Women’s Development Association has started a free school bus service for students from underprivileged backgrounds. However, we also sincerely request you to consider contributing Rs. 450 per student per month to support this project financially.”
माझे पालक ऊस तोड कामगार आहेत.आणि आमचे गाव हे अत्यंत दुर्गम भागात आहे.आणि इकडे कोणत्याही प्रकारचे परिवहन माध्यम उपलब्ध नाही,त्यामुळे आतापर्यंत चे शिक्षण मी पायी चालत शाळेत ये जा करून पूर्ण केले आहे.पण अनेकदा घरचे लोक चिंतेत असायचे आणि,आता खूप झाले शिक्षण,असे म्हणायचे त्यामुळे खूप चिंता वाटायची आणि आता आपले शिक्षण बंद होणार असं वाटायचं,पण आपल्या मोफत स्कूल बस मुळे आता आमच्या घरात,नव्हे संपूर्ण गावातच आनंदाचे वातावरण पसरले आहे.आपल्या या मदतीमुळे आता आमच्यासारख्या दुर्गम भागातील मुले शिक्षित होऊ शकतील आणि आपल्या स्वप्नांना गवसणी घालू शकतील,आपले मानावे तितके आभार कमीच आहेत.धन्यवाद!
सर्व देणगीदारांच्या मदतीने सत्यशोधक महिला विकास मंडळ मार्फत दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूलबस सुरू करण्यात आली आहे. तरी आपण सुद्धा रुपये 450/- प्रति विद्यार्थी प्रति महिना देऊन ह्या प्रकल्पात मोलाचा हातभार लावावा हीच सदिच्छा.