The free school bus is receiving support from many levels. Adding to this is the contribution from these little ones. They have donated their pocket money, which they usually use for snacks, to fund the free school bus. Although this amount may seem small, it is invaluable to us. These children mentioned that their friends used to walk to school before. Seeing their difficulties and hardships made them want to help. Often, their friends could not come to school due to rain, which made them feel bad. But now, thanks to the free school bus, their friends are able to come to school regularly and on time, without any trouble. Therefore, they are handing over the money they received for snacks at home for the free bus service.
While handing over this donation, these little ones also insisted, “Please keep this service running as it is; don’t stop it. We will provide any help we can.”
“With the help of generous donors, the Truthseeker Women’s Development Association has started a free school bus service for students from underprivileged backgrounds. However, we also sincerely request you to consider contributing Rs. 450 per student per month to support this project financially.”
मोफत स्कूल बस ला अनेक स्तरावरून पाठींबा मिळत आहे.यात भर पडली आहे या चिमुकल्या लेकरांची,या मुलांनी आपल्या खाऊ च्या पैशातून मोफत स्कूल बस साठी निधी उपलब्ध करून दिला आहे.ही रक्कम कमी असली असली तरीही आमच्यासाठी ती अनमोल आहे.ह्या चिमुकल्यांनी सांगितले की,आमचे मित्र – मैत्रिणी अगोदर पायी शाळेत यायचे.त्यांचा त्रास,होणारे हाल बघून आम्हालाही कसेतरी व्हायचे.कित्येकदा आमचे मित्र पावसामुळे शाळेत येत नव्हते.तेव्हा वाईट वाटायचे.पण मोफत स्कूल बस मुळे ते रोज नियमित वेळेवर शाळेत येत आहेत,आणि त्यांना आता कसलाही त्रास नाही,म्हणून आम्ही या मोफत बस साठी आम्हाला घरातून खाऊ साठी मिळालेले पैसे अपणाकडे सुपूर्द करत आहोत.
हा निधी सोपविताना ह्या चिमुकल्यांनी, कृपया ही सेवा अशीच चालू राहू द्या,ती बंद करू नका,आम्ही होईल ती मदत करू, असा आग्रह देखील केला !
सर्व देणगीदारांच्या मदतीने सत्यशोधक महिला विकास मंडळ मार्फत दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूलबस सुरू करण्यात आली आहे. तरी आपण सुद्धा रुपये 450/- प्रति विद्यार्थी प्रति महिना देऊन ह्या प्रकल्पात मोलाचा हातभार लावावा हीच सदिच्छा.