Free school bus service has been made available for children from the remote areas of Niragudi, Thakharwadi, Nim Dongri, and Kautgaon through the Satyashodhak Mahila Vikas Mandal. This bus service has energized both students and parents. Previously, these students had to cross mountains, valleys, and rivers, walk through mud, and endure the burden of carrying school bags for miles. However, all these difficulties have been eliminated due to the free school bus service.
The above scheme is being implemented through donations. These donors play a crucial role in shaping the students’ lives. The students have recognized this value and expressed their gratitude towards the donors and the organization. The free school bus plays an important role in providing students with free education. Therefore, it is the responsibility of every conscientious person to ensure the success of this scheme and support the educational journey of children from these impoverished, remote areas. This responsibility is ours!
“With the help of generous donors, the Truthseeker Women’s Development Association has started a free school bus service for students from underprivileged backgrounds. However, we also sincerely request you to consider contributing Rs. 450 per student per month to support this project financially.”
निरगुडी , ठाकर वाडी, निम डोंगरी , कौटगाव या दुर्गम भागातील मुलांसाठी सत्यशोधक महिला विकास मंडळ मार्फत मोफत स्कूल बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.या बस मुळे विद्यार्थी ,पालक यांच्यात नाव चैतन्य संचारले आहे. या अगोदर या विद्यार्थ्यांना डोंगर दऱ्या , नदी ओलांडून यावे लागत असे.चिखलात पाय तुडवत चालावे लागे, कैक मैल पाठीवर दप्तराचे ओझे घेऊन पायपीट करावी लागे,परंतु या सर्व अडचणी मोफत स्कूल बस मुळे नाहीशा झाल्या आहेत.
सदरील योजना ही देणगी माध्यमातून राबवली जात आहे.हे देणगीदार विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देण्यात मोलाची भूमिका बजावत आहे.विद्यार्थ्यांनीही याचे मोल जाणून देणगीदार आणि संस्थे बद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे,सदरील मोफत स्कूल बस विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे,त्यामुळे ह्या योजनेला यशस्वी करण्याची आणि या गोरगरीब, दुर्गम भागातील मुलांच्या शैक्षणिक प्रवासात त्यांना साथ देण्याची जबाबदारी प्रत्येक सजग व्यक्तीची आहे,ही जबाबदारी आपली आहे !
सर्व देणगीदारांच्या मदतीने सत्यशोधक महिला विकास मंडळ मार्फत दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूलबस सुरू करण्यात आली आहे. तरी आपण सुद्धा रुपये 450/- प्रति विद्यार्थी प्रति महिना देऊन ह्या प्रकल्पात मोलाचा हातभार लावावा हीच सदिच्छा.