Mr. Krishna Pawar, the guardian of Rajshree Krishna Pawar, has expressed his happiness about the free school bus service provided for his daughter. He said that his daughter used to endure hardships walking to school in the rain and sun, carrying the heavy load of her backpack over long distances. It felt very disheartening, but there was no alternative because he deeply wished for his daughter to receive a good education and build a future. Now, with the free school bus service provided by your organization, our entire family is extremely happy, and we are assured that my daughter will face no difficulties in her education. I will always be grateful for this support. Thank you!
“With the help of generous donors, Satyashodhak Mahila Vikas Mandal, has started a free school bus service for students from underprivileged backgrounds. However, we also sincerely request you to consider contributing Rs. 450 per student per month to support this project financially.”
राजश्री कृष्णा पवार हिचे पालक श्री.कृष्णा पवार यांनी आपल्या मुलीला शाळेत जाण्यासाठी मोफत स्कूल बस सुविधा मिळत असल्याने आनंद व्यक्त केला आहे.ते म्हणाले की,माझी मुलगी पावसात,उन्हात त्रास सहन करत शाळेत पायी जायची.दप्तराचे ओझे दूर पर्यंत पाठीवर घेऊन पायपीट करत घर गाठायची.मनातून फार वाईट वाटे,पण इलाज नव्हता कारण माझ्या मुलीने खूप शिकावं आणि आपलं भविष्य साकारावं,अशी मनातून खूप इच्छा आहे,पण आता तिला आपल्या संस्थेमार्फत मोफत स्कूल बस सेवा मिळत आहे,त्यामुळे आम्हाला पूर्ण परिवाराला अत्यंत आनंद वाटत आहे,आणि माझ्या मुलीला शिक्षणात काही अडचण येऊ शकणार नाही याची खात्री वाटत आहे,मी या सहकार्याबद्दल आपला सदैव ऋणी राहील,धन्यवाद !
सर्व देणगीदारांच्या मदतीने सत्यशोधक महिला विकास मंडळ मार्फत दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूलबस सुरू करण्यात आली आहे. तरी आपण सुद्धा रुपये 450/- प्रति विद्यार्थी प्रति महिना देऊन ह्या प्रकल्पात मोलाचा हातभार लावावा हीच सदिच्छा.