Rajlaxmi Ambadas Rathod ,Class-10th, From – Thakarwadi
Feeling Thankful For Getting Free School Bus Service.
“I live in Thakarwadi, a very remote area. I completed my primary education in my village. For further education, I have to travel 8 kilometers to the neighboring village from my home. There is no proper road for this journey; I have to cross rivers, walk on rocky paths, endure the monsoon’s hardships, and withstand the cold. Pursuing education was very distressing for me, but now, thanks to the free school bus service you have started, I can safely, comfortably, and punctually reach school and return home. This has relieved my parents of worry, and I wholeheartedly thank you and your organization on behalf of myself and my family. Thank you very, very much!”
“With the help of generous donors, Satyashodhak Mahila Vikas Mandal has started a free school bus service for students from underprivileged backgrounds. However, we also sincerely request you to consider contributing Rs. 300 per student per month to support this project financially.”
मी ठाकर वाडी या अत्यंत दुर्गम भागात राहते.माझे प्राथमिक शिक्षण माझ्याच गावात पूर्ण झाले.त्यानंतर मला पुढील शिक्षण घेण्यास घरापासून 8 किलोमिटर अंतरावर असलेल्या गावी जावे लागत आहे. सदर प्रवासासाठी व्यवस्थित रस्ता नाही,नदी ओलांडून जावे लागते,डोक्यावर ऊन झेलावे लागते,पावसाचा मारा सहन करावा लागतो आणि थंडीही सहन करावी लागते.माझ्यासाठी शिक्षण घेणे अत्यंत वेदनादायक होऊन बसले होते,परंतु आता कसलीही अडचण उरली नाही,आपण सुरू केलेल्या मोफत स्कूल बस मुळे मी सुरक्षित,आरामशीर आणि वेळेवर शाळेत पोहोचत आहे आणि घरीही वेळेत पोहचत आहे,ज्यामुळे माझ्या पालकांचीही काळजी मिटली आहे,मी माझ्या व माझ्या परिवाराच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार मानते,खूप खूप धन्यवाद!
“सर्व देणगीदारांच्या मदतीने सत्यशोधक महिला विकास मंडळ मार्फत दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूलबस सुरू करण्यात आली आहे. तरी आपण सुद्धा रुपये 300/- प्रति विद्यार्थी प्रति महिना देऊन ह्या प्रकल्पात मोलाचा हातभार लावावा हीच सदिच्छा.”