सत्यशोधक महिला विकास मंडळ संचालित तिसगाव विद्यालय तर्फे एक छोटी विनंती आहे की, ग्रामीण भागातील गरीब पण होतकरू विद्यार्थ्यांना तुम्ही आपल्या सणातील आनंदात सहभागी करून घ्यावे. केवळ रु. ५० ते ३०० देणगी करून आपण आपल्या सणामध्ये अजून एका चिमुकल्या जीवाला सामील करून घेऊ शकता. आम्ही संस्था म्हणून तुम्ही दिलेली रक्कम खालील गोष्टी विकत घेण्यासाठी खर्च करून विद्यार्थ्यांपर्यंत दिवाळी च्या आधी पोहचवू.
1. शैक्षणिक साहित्य (कलर पेन्सिल बॉक्स, रंगकला साहित्य, स्टडी टेबल, मॅजिक स्लेट, ई. )
2. चिकित्सक साहित्य ( दुर्बिण, लांबी मोजण्याचा टेप, जगाचा आणि भारताचा नकाशा, लोह चुंबक चा सेट, भिंग, ई.)
3. सुविधाजनक साहित्य (ड्रेस, बूट, दप्तर, छत्री, घडयाळ, इनव्हरटर बल्ब, ई.)
आपल्याला वरील भेटीसाठी किती रक्कम देणगी करावी लागेल ह्याचा अंदाज येणे करिता ही यादी.
https://www.amazon.in/hz/wishlist/ls/2ECAIBOCMFI6X?ref_=wl_share
आनंद वाटल्याने वाढतो हे आपल्याला अनुभूत आहेच, “दिवाळी भेट” हा उपक्रम ह्याच पार्श्वभूमीवर संकल्पित असून “सत्यशोधक महिला विकास मंडळ” हे संस्था म्हणून एक माध्यम आहे. गरजू असले तरी आपले लाडके विद्यार्थी कधीही कोणाला काही मागत नाहीत. ते स्वावलंबी होण्याचे स्वप्न घेऊन जगतात. “दिवाळी भेट” ही त्यांना मदत नसून आपले त्यांच्यावरचे पालक म्हणून असलेले प्रेम आहे.
1. शैक्षणिक साहित्य (कलर पेन्सिल बॉक्स, रंगकला साहित्य, स्टडी टेबल, मॅजिक स्लेट, ई. )
2. चिकित्सक साहित्य ( दुर्बिण, लांबी मोजण्याचा टेप, जगाचा आणि भारताचा नकाशा, लोह चुंबक चा सेट, भिंग, ई.)
3. सुविधाजनक साहित्य (ड्रेस, बूट, दप्तर, छत्री, घडयाळ, इनव्हरटर बल्ब, ई.)
आपल्याला वरील भेटीसाठी किती रक्कम देणगी करावी लागेल ह्याचा अंदाज येणे करिता ही यादी.
https://www.amazon.in/hz/wishlist/ls/2ECAIBOCMFI6X?ref_=wl_share
आपण पाठविलेल्या रकमेच्या 50% रक्कम ही इन्कम टॅक्स च्या मूळ उत्पन्नातून (taxable income) वजा केली जाते. त्यासाठी आपले पॅन कार्ड संबंधी माहिती संस्थेकडे जमा करणे अनिवार्य आहे.
हो. आपण भेट देणाऱ्या व्यक्तीचे नाव आपल्या अधिकृत यादीत नोंदविणार आहोत. आणि जर आपण काही विशेष भेट जसे की ड्रेस, सायकल इत्यादी भेट केल्यास भेट देणाऱ्या व्यक्तीचे लाभार्थी विद्यार्थ्यांसोबत फोन अथवा विडियो कॉल करून दिला जाईल.
हो. आपल्या आवडीच्या विद्यार्थ्यांना भेट देण्याची विशेष सोय आपण केलेली असून रक्कम अदा केल्यावर आपण 8390042457 ह्या क्रमांकावर whatsapp द्वारे पेमेंट केल्याची माहिती आणि लाभार्थी विद्यार्थी नाव लिहून पाठवावे.