The boy named Sudarshan Sunil Rathod comes from a very poor family. Sudarshan’s parents are intellectually challenged and wander for their livelihood. Due to their circumstances and intellectual disabilities, they have not prepared Sudarshan’s educational documents. As a result, Sudarshan is being denied admission to school because he does not have an Aadhaar card or any other documents. Consequently, the future of this innocent child seems to be bleak.
If a child is deprived of education solely due to the lack of an Aadhaar card, it is crucial to first obtain the Aadhaar card. However, since they do not have the necessary documents for the Aadhaar card, the case goes to court, which typically incurs a cost of around 8,000 to 9,000 rupees. Therefore, through this medium, we request you to generously assist in bringing Sudarshan into the educational mainstream. Thank you!
सदरील मुलगा सुदर्शन सुनील राठोड हा अतिशय गरीब कुटुंबातून आहे.सुदर्शन चे आई वडील मतिमंद आहेत,आणि उपजिविकेसाठी भटकंती करत असतात.त्यांच्या परिस्थितीमुळे आणि बौद्धिक विकलांगपणामुळे त्यांनी सुदर्शन चे शैक्षणिक कागदपत्रे तयार केले नाहीत,परिणामी आधार कार्ड नसल्याने व इतर कोणतीही कागदपत्रे नसल्या कारणाने,सुदर्शन ला शाळेत प्रवेश नाकारला जात आहे.या मुळे या निरागस बालकाचे भवितव्य अंधकारमय होताना दिसत आहे.
केवळ आधार नसल्याने एखादा मुलगा शिक्षणापासून वंचित राहत असल्यास ,सर्वप्रथम त्याचे आधार कार्ड बनविणे अत्यंत महत्वाचे आहे,परंतु आधार साठी आवश्यक कागदपत्रे त्यांच्याकडे नसल्याने सदर प्रकरण हे न्यायालयाचे कक्षेत जाते,आणि त्यासाठी साधारणतः 8 ते 9 हजार रुपये खर्च येतो.त्यामुळे या माध्यमातून आम्ही आपणास विनंती करतो की,सुदर्शन यास शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण सढळ हाताने मदत करावी,धन्यवाद!