Gopal Gokul Chavan Talking About Free School Bus Service
I also completed my education at this school, and now my younger sister is studying here as well. Previously, my sister and all of us students had to walk long distances on foot, as there was no other option; education was a priority. We endured many hardships, whether it was sun or rain, but now our organization has provided excellent facilities. My sister, Netal Gokul Chavan, now comes to school by the free school bus. She arrives at school on time and returns home on time as well. We no longer have to worry about her, and we don’t have to wait anxiously for her return. We are sincerely grateful to your organization for this!
“With the help of generous donors, Satyashodhak Mahila Vikas Mandal, has started a free school bus service for students from underprivileged backgrounds. However, we also sincerely request you to consider contributing Rs. 450 per student per month to support this project .financially.”
मी देखील माझे शिक्षण याच शाळेतून पूर्ण केले आहे,आणि आता माझी लहान बहीण देखील येथे शिकत आहे.या अगोदर मला , माझ्या बहिणीला व आम्हा सर्व विद्यार्थ्यांना दूर पायी चालत यावे लागायचे,त्याशिवाय पर्याय नव्हता,कारण शिक्षण पूर्ण करायचे होते.आम्ही खूप हाल सहन केले आहेत.उन असो पाऊस असो आम्हाला पायी चालत यावे लागायचे.पण आता खूप छान सुविधा आपल्या संस्थेने दिली आहे.माझी बहिण नेतल गोकुळ चव्हाण आपल्या मोफत स्कूल बस ने शाळेत येते.ती आता वेळेत शाळेत येते आणि घरीही वेळेत येते.आता आम्हाला तिची काळजी वाटत नाही,आणि ती परतण्याची वाट बघत बसावं लागत नाही,त्याबद्दल आपल्या संस्थेचे मनःपूर्वक आभार!
सर्व देणगीदारांच्या मदतीने सत्यशोधक महिला विकास मंडळ मार्फत दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूलबस सुरू करण्यात आली आहे. तरी आपण सुद्धा रुपये 450/- प्रति विद्यार्थी प्रति महिना देऊन ह्या प्रकल्पात मोलाचा हातभार लावावा हीच सदिच्छा.