जादूची विहीर - श्रीषा च्या गोष्टी
खूप खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट ! एका घनदाट जंगलामध्ये अगदी मध्यभागी छोटेसे आश्रम होते. ही आश्रम अत्यंत ज्ञानी ऋषि दूर्वसा यांचे होते. त्यांच्या आश्रमामध्ये एक विहीर होती. सगळे म्हणायचे की ही विहीर “जादुई” होती. ह्या विहीरीच्या जवळ जाऊन मनातली इच्छा मागितली असता, ती लगेच पूर्ण होते, अशी अख्याईका होती. ही माहिती जंगलाबाहेरील गावांमध्ये पसरली. माहिती ऐकल्यावर सर्वांना विहीर बघायची इच्छा व्हायची. पण ते जंगल इतके घनदाट आणि त्यात वाघ, बिबट्या आणि विषारी साप देखील राहत होते. त्यामुळे कोणालाही त्या जंगलात जाण्याची हिम्मत होत नसे.
चिमनगांव म्हणून एका गावात एक म्हातारे बाबा, त्यांची सून अहिल्या आणि त्यांची नात शर्वरी राहायची. एका दिवशी शर्वरी चे पोट खूप दुखायला लागले. वैद्य बोलावले, औषध दिले तरी छोट्याश्या शर्वरी ला आराम मिळाला नाही. गावात सगळे चिंता करू लागले. शर्वरीच्या बाबांना एक युक्ती सुचली. त्यांनी जादूच्या विहिरीला भेट देऊन शर्वरी च्या आरोग्यासाठी प्रार्थना करायचे ठरवले.
दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांनी शर्वरी च्या आईला त्यांच्या मनातली गोष्ट सांगितली. पण शर्वरीची आई बाबांना जाऊ देईना. कारण बाबांच्या डाव्या पायाला खूप लागले होते. त्यामुळे ते लंगडत लंगडत चालायचे. असे असताना त्यांना जंगलामद्धे काही झाले तर ? शर्वरीची आई नको म्हणाली.
बाबांनी शर्वरी कडे बघता बघता विचार केला आणि अहिल्याला म्हणजेच शर्वरी च्या आईला “मी येतो” असे म्हणून जंगलात निघून गेले. छोटीशी शर्वरी बाबा दूर चालले म्हणून अजून जोरात रडू लागली. शर्वरी चे रडणे ऐकून ऋषि महाराज त्यांच्या घरात आले. मग शर्वरी आणि तिच्या आईने ऋषि महाराजांना सगळे सांगितले. ऋषि हळूच हसले आणि तिथून निघून गेले.
शर्वरीचे बाबा जंगलाच्या घनदाट झाडी मध्ये हळू हळू पुढे चालत होते. त्यांना अचानक मागून कोणीतरी चालत येत आहे अशी चाहूल लागली. बाबा आहे तिथे थांबले आणि मागे वळून दूर पर्यन्त पाहू लागले. त्यांना काहीच दिसत नवते परंतु आवाज हळू हळू जवळ आल्यासारखा वाटत होता. बाबा सावध झाले आणि एका झाडामागे लपले. आवाजाच्या दिशेने बघताना त्यांना कोणीतरी चालत असल्याचे दिसले. त्यांनी निरखून पाहिल्यावर ते “ऋषि महाराज” होते. बाबांना ऋषि महाराजांना पाहून खूप आनंद झाला. त्यांनी ऋषि महाजांना नमस्कार केला.
त्यानंतर बाबा आणि ऋषि दोघेही गप्पा मारत मारत आश्रमात पोहोचले. बाबांनी ऋषि महाराजांना विहीरीची माहिती विचारली. ऋषि बाबांना विहिरीजवळ घेऊन गेले आणि त्यांच्या कानात गुप्त मंत्र सांगितला. बाबांनी विहिरीजवळ उभे राहुन तो मंत्र आणि त्यानंतर आपली मनातली इच्छा विहिरीला सांगितली. आणि ते परत ऋषि महाराजनसोबत गावाकडे निघाले.
म्हातारे बाबा लंगडत असल्याने त्यांना जंगलातून जाताना खूप त्रास झाला. ते 2-3 वेळा पी अडकून पडले सुद्धा. पण दुसऱ्यादिवशी बाबा आणि ऋषि दोघेही सुखरूप घरी आले. घरी येताच बाबा शर्वरी ला शोधू लागले, पण शर्वरी घरात नव्हती. मग ते घराच्या मागच्या मैदानात गेले. मैदानात जाऊन बघतात तर काय ? शर्वरी आणि तिच्या सगळ्या मैत्रिणी खेळत होत्या. बाबांना त्यांची लाडकी शर्वरी अशी खेळताना पाहून खूप आनंद झाला. “जादूची विहीर खरच मनाची इच्छा पूर्ण करते” बाबा आनंदात म्हणाले.
शर्वरीची आई गोठयातून बाहेर आली आणि बाबांच्या आणि ऋषींच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. बाबांच्या हिम्मतीचे करावे तितके कौतुक कमी होते. लाडक्या शर्वरीसाठी बाबांनी आपल्या जिवाची परवा केली नाही. आता मात्र शर्वरी ची आई खूप आनंदी असताना म्हणाली की, “बाबा, आता तुमच्यासाठी मी जादूई विहिरीला भेट देणार आहे.”. ऋषि महाराज असल्याने अहिल्या आणि शर्वरी दोघी सुद्धा आश्रमात जाण्यासाठी सज्ज झाल्या. त्यांनी बाबांसाठी आणि ऋषि महाराजन्साठी छान भोजन बनवले आणि शर्वरी परत एकदा स्वस्थ झाल्याचा आनंद घरच्यासोबत साजरा केला.
दुसऱ्या दिसशी ऋषि, शर्वरी आणि अहिल्या तिघेही आश्रमाला भेट द्यायला निघाले. त्याच दिवशी परत यायचे म्हणून ते जंगलात भरभर चालू लागले. रस्त्यात त्यांना सांप दिसले. वेगवेगळे आवाज आले. पण ते घाबरले नाहीत. आश्रमाकडे चालत राहिले. गावात पोहोचल्यावर शर्वरी ला खूप छान वाटले. ती तिथे खेळायला लागली. आणि खेळता खेळता विहिरीजवळ पोहोचली. विहीर दिसताच छोट्या शर्वरी ने आईला जोरात आवाज दिला.
मागून शर्वरी ची आई आणि ऋषि येतच होते. मग ऋषींनी अहिल्या आणि शर्वरी ला मंत्र सांगितला आणि त्यानंतर शर्वरी आणि अहिल्या विहिरी जवळ उभे राहून मंत्र आणि त्यानंतर मनातली इच्छा सांगितली. आणि विहिरीला नमस्कार करून ते तिघेही परत चिमन गाव ला निघाले. जंगलातून परत येताना संध्याकाळ झाली आणि अंधार पडायला लागला. छोट्या शर्वरी ला अंधाराची भीती वाटू लागली. मग ऋषि महाराज शर्वरी म्हणाले, “बाळ शर्वरी घाबरू नकोस, मारुती स्तोत्र मोठ्याने म्हण.” शर्वरी ने लगेच मारुती स्तोत्र मोठ्याने म्हणायला सुरुवात केली.
“भीमरूपी महरुद्र वज्र हनुमान मारुती..”
स्तोत्र म्हणायला सुरुवात करताच शर्वरी ची भीती पळून गेली.
थोडा वेळ चालत राहिल्यावर चिमनगाव पण आले. शर्वरी बाबांना आवाज देत पळत पळत घरात गेली, तर बाबा घरात नव्हते. मग ती घराच्या मागच्या मैदानात गेली तर तिला खूप आनंद झाला. म्हातारे बाबा शर्वरी च्या दिशेने अगदी भरभरा चालत येत होते. त्यांचा पाय बरा झाला होता. सर्वांना बाबांचा इतक्या वर्षांपासून दुखणारा पाय बरा झाला म्हणून खूप आनंद झाला. त्यांनी त्या रात्री सुद्धा खूप छान मेजवानी केली आणि सोहळा साजरा केला.