Hrushikesh Ishwar Chavans Father Giving Their Valuable Response on our “Donate Shoe” Cause
My son Hrishikesh is intelligent and hardworking. He goes to school regularly. Although the school is fully equipped, sometimes he has to walk to school due to the unavailability of transportation, which troubles him especially during rainy or hot days. Despite facing such difficulties, he is determined to continue his education. Your institution has strengthened his resolve by providing him with boots, and due to the durable quality of the boots, he remains in good condition even after a year. Every day, when he puts on those boots before going to school, the sparkle and joy in his eyes bring me immense satisfaction. He firmly believes, “I will learn a lot, and I will brighten my parents’ name.” His determination is evident in his eyes. While I cannot express my gratitude in words for providing our students with free education along with other basic amenities, I still pray that your noble work of uplifting economically.
माझा मुलगा हृषिकेश हा हुशार आणि मेहनती आहे.तो नियमित शाळेत जातो.घरापासून शाळेचे अंतर भरपूर आहे,परंतु काही सुविधा उपलब्ध नसल्याने त्याला पायीच जावे लागते.अशात उन, वारा ,पाऊस या नैसर्गिक क्रियांमुळे तो त्रस्त होत असे.कितीही त्रास झाला तरी त्याची शिकण्याची जिद्द पक्की आहे.आपल्या संस्थेने त्याला बूट देऊन त्याची जिद्द आणखी मजबूत केली आहे,बूट दर्जेदार असल्याने एक वर्ष उलटूनही ते सुस्थितीत आहेत.दररोज शाळेत निघताना तो जेव्हा ते बूट घालत असतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील तेज,आणि आनंद पाहून मनाला फार समाधान वाटते.रस्ता कितीही खडतर असू देत,”मी खूप खूप शिकणार,आणि माझ्या आई – वडिलांचे नाव उज्वल करणार” असाच प्राण जणू काही त्याचे डोळ्यात दिसते.आपण आपल्या शाळेतून विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाबरोबर इतर मूलभूत सुविधा तसेच गरजाही पुरवीत आहात याचे आभार शब्दांत व्यक्त करणे कदापि शक्य नाही,तरी देखील आपल्या हातून असेच गोरगरीब विद्यार्थ्याच्या उद्धराचे कार्य घडत राहो अशी मी प्रार्थना करतो आणि आपल्याला हृदयापासून धन्यवाद देतो.